राजापूर येथील अपघातात देवगड येथील तरुणाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:58+5:302021-07-09T04:20:58+5:30

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर पन्हळेनजीक दुचाकीस्वाराने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात जयेश दिलीप जोशी (२१ रा. ...

A youth from Devgad died on the spot in an accident at Rajapur | राजापूर येथील अपघातात देवगड येथील तरुणाचा जागीच मृत्यू

राजापूर येथील अपघातात देवगड येथील तरुणाचा जागीच मृत्यू

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर पन्हळेनजीक दुचाकीस्वाराने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात जयेश दिलीप जोशी (२१ रा. तारामुंबरी, ता. देवगड जि. सिंधुदुर्ग) हा तरुण जागीच ठार झाला आहे. तर त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा सहकारी ओंकार प्रकाश गावकर (२२) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान घडला.

दुचाकीस्वार जयेश याने भरधाव वेगात येऊन त्याच्या पुढे असणाऱ्या वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाला असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र,ज्या वाहनाला धडक दिली तो वाहन चालक फरार झाल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. जयेश हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. तो पन्हळे येथे आला असताना सकाळच्या धुक्यामुळे पुढे वाहन असल्याचे त्याचे लक्षात न आल्याने तो समाेरच्या वाहनावर आदळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला तर, त्याच्यासोबत पाठीमागे बसलेला ओंकार गावकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. जखमी जयेश याला उपचारार्थ दाखल केले. या अपघाताची मााहिती मिळताच राजापूर पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुलेकर, सागर कोरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास राजापूर पाेलीस करीत आहेत.

Web Title: A youth from Devgad died on the spot in an accident at Rajapur