चिपळुणातील तरुणांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:18 IST2021-03-30T04:18:42+5:302021-03-30T04:18:42+5:30
अडरे : चिपळूण येथे पार पडलेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यात साजिद सरगुरोह या कार्यकर्त्यासह सहकाऱ्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या ...

चिपळुणातील तरुणांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश
अडरे : चिपळूण येथे पार पडलेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यात साजिद सरगुरोह या कार्यकर्त्यासह सहकाऱ्यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी स्वागत करून आपल्याला काँग्रेस पक्षात काम करण्यासाठी नक्कीच संधी दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा धवल मार्ट येथील सभागृहात पार पडला. यावेळी युवा कार्यकर्ता साजिद सरगुरोह, वसीम सुर्वे, अश्फाक मोमीन, अल्ताफ काझी, मुस्तफा पटेल, हुजेर घारे, असलम खान, फरहान तांबे, फरहान चौगुले, साद दळवी, जिशान चौगुले, मुदस्सर चौगुले, आयान आलेकर, शहानवाज पोटे, अजीम मुजावर, फैजान खान, शफिक खान, सैफ काझी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग, बेसिक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, शहराध्यक्ष फैसल पिलपिले आदींनी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.