शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मतदान न केल्याच्या रागातून तरुणाला मारहाण, भाजप तालुकाध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल; रत्नागिरी जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:34 IST

देवरूख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील गोठणे पुर्नवसन येथील तरुणाने निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान न केल्याचा रागापोटी त्या तरुणाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी (१० रोजी) हातीव येथे घडली. याप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम, हातीव गावचे सरपंच नंदकुमार कदम यांच्यासह ५ जणांवर देवरूख पोलिस स्थानकात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सुनील शामराव पवार (वय २९, रा. गोठणे पुनर्वसन) यांनी देवरूख पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रुपेश कदम, नंदकुमार कदम (दोघेही रा. हातीव), अक्षय शिंदे, अमित रेवाळे (दाेघेही रा. आंगवली), प्रथमेश धामणस्कर (रा. देवरूख) यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील पवार व त्यांचे मित्र अंकुश उंडे, नीलेश पवार हे जेवण करण्यासाठी १० रोजी रात्री ८:३० वाजता हातीव येथील हाॅटेलमध्ये गेले होते. सुनील पवार यांचे गावातील मित्र प्रकाश उंडे यांनी निवडणुकीत मदत न केलेले माझे मित्र हॉटेलमध्ये असल्याचे रूपेश कदम यांना दूरध्वनीवरून सांगितले.भाजपला निवडणुकीत मतदान न केल्याचा राग नंदकुमार कदम, रूपेश कदम, अक्षय शिंदे, अमित रेवाळे, प्रथमेश धामणस्कर यांनी मनात धरून सुनील पवार व त्यांच्या मित्रांच्या अंगावरून धावून जात शिवीगाळ करत मारहाण केल्याचे सुनील पवार याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९३१ चे कलम ३७ (१) (३) यांचा मनाई आदेश असताना उल्लंघन केल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार श्रीकांत जाधव करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth assaulted for not voting; BJP leader, five booked.

Web Summary : A youth was assaulted in Ratnagiri for not voting for the BJP. A BJP leader and four others have been booked by police following the incident that occurred on Tuesday. The victim, Sunil Pawar, filed a complaint at the Deorukh police station.