आपले काम - आपली स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:34 IST2021-08-22T04:34:00+5:302021-08-22T04:34:00+5:30

उभे राहणे - ज्यांना सातत्याने उभं राहण्याचा व्यवसाय किंवा जॉब करावा लागतो. त्यांनी खालील गोष्टी आवर्जून कराव्यात. अर्थात काही ...

Your job - your position | आपले काम - आपली स्थिती

आपले काम - आपली स्थिती

उभे राहणे - ज्यांना सातत्याने उभं राहण्याचा व्यवसाय किंवा जॉब करावा लागतो. त्यांनी खालील गोष्टी आवर्जून कराव्यात. अर्थात काही नोकऱ्या अशा असतात, त्यांना दोन्ही पायांवर बराच काळ उभे रहावे लागते. एकाच स्थितीत रहावे लागते. उदा. ट्रॅफिक पोलीस, मशीनवर काम करणारे तंत्रज्ञ किंवा खूपवेळ घेऊन महत्त्वाचे ऑपरेशन्स किंवा सर्जरी करणारे सर्जन्स, शिक्षक, स्वयंपाक घरातील स्त्री इत्यादी.

यांना हमखास व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायाच्या नसा (तिला नावाच्या रक्तवाहिन्या) त्या अशुद्ध रक्त हृदयाकडे नेतात, त्या फुगणे म्हणजेच ताठर होणे किंवा कडक होणे हा त्रास होतो. पोटऱ्या दुखणे, व्हीनस थ्रॉम्बोसिस म्हणजेच रक्त पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे पाेटऱ्या सुजणे आणि दुखणे असे त्रास संभवतात, होतात.

म्हणून ज्यांना उभे राहण्याचे सतत, नॉन स्टॉप काम करावे लागते, त्यांनी आपले काम आटोपल्यावर घरी आल्यावर शांतपणे अगोदर संपूर्ण हात आणि पाय गार पाण्याने (म्हणजे बर्फाच्या पाण्याने नव्हे, त्यानेही त्रास होतो) अगदी कोपरापर्यंत, पाय गुडघ्यापर्यंत स्वच्छ धुवून काढावेत. मस्त पुसून काढावेत. शांतपणे आपल्या बेडवर यावे. दोन्ही पाय ४५ (पंचेचाळीस अंशातून) गुडघे ताठ ठेवून भिंतीला टेकून साधारण दहा मिनिटे ठेवावेत. यामुळे अशुद्ध रक्त हृदयाकडे जाऊन त्याचवेळी शुद्ध रक्त पायांच्या बोटांपर्यंत येते. जमल्यास हळुवारपणे खालून वर हलक्या हाताने दाबत वर न्यावा. त्याला आम्ही ‘Self Help Pressure Massage’ म्हणतो. तो करावा, एकदम हलके वाटेल. आराम वाटेल. झोपही चांगली लागेल. पाय दुखणार नाहीत. पायाच्या शिरा फुगणार नाहीत. व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होणार नाही, पोटऱ्या वळणार नाहीत. सुरुवातीपासूनच ही सवय लावून घ्यावी. फक्त १० मिनिटे अशी स्वत:ला स्वत:च्या पायासाठी द्यावीत. यामुळे कंबरेलाही आराम मिळेल.

Web Title: Your job - your position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.