गुहागर : निष्काळजीपणामुळे पक्षी मारण्याच्या बंदुकीचा ट्रिगर अचानक दाबला गेल्याने बंदुकीतील छरा लागून एक तरुणी गंभीर जखमी झाली. हा प्रकार गुहागर तालुक्यातील वेळंब पिंपळवाडी येथे शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी गुहागर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मयुरी सखाराम पिंपळे (वय २१) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मयुरी शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये मोबाइलचा चार्जर शोधत होती. त्याच वेळी अल्पेश अनंत पिंपळे (वय २८) हा तिच्या पाठीमागून आला.अल्पेशच्या हातात पक्षी मारण्याची बंदूक होती. बंदूक हाताळत असताना अल्पेशच्या हातून बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला. यामुळे बंदुकीतील छरे थेट मयुरीच्या डाव्या खांद्याला लागून शरीरात घुसले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली.या प्रकरणी अल्पेश अनंत पिंपळे याच्यावर गुहागर पोलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १२५ (ब) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Summary : In Guhagar, a girl was seriously injured when a pellet gun accidentally discharged. The incident occurred in Velamb Pimpelwadi. Police have registered a case against the youth involved for negligent handling of the weapon.
Web Summary : गुहागर में एक युवती गलती से चली गोली लगने से गंभीर रूप से घायल हो गई। घटना वेलंब पिंपलवाड़ी में हुई। पुलिस ने हथियार के लापरवाहीपूर्ण इस्तेमाल के लिए युवक के खिलाफ मामला दर्ज किया है।