पोहायला गेलेला तरुण बुडाला

By Admin | Updated: July 21, 2014 23:39 IST2014-07-21T23:31:31+5:302014-07-21T23:39:24+5:30

खेड तालुक्यातील दुर्घटना

The young swim of the swimming pool | पोहायला गेलेला तरुण बुडाला

पोहायला गेलेला तरुण बुडाला

चिपळूण : खेड तालुक्यातील दाभिळ बाजारवाडी येथे आज, सोमवारी दुपारी पोहायला गेलेला १७ वर्षीय तरुण खाणीमधील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. राज संतोष टेमकर असे त्याचे नाव आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत लवेल व दाभिळ बाजारवाडी दरम्यान औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या जुन्या चिऱ्याच्या खाणीत पाणी साचले होते. या खाणीत मुले पोहायला जातात. आज राज (दाभिळ) आपल्या घरी मित्रांबरोबर पोहायला जातो, असे सांगून दुपारी २ वाजता घराबाहेर पडला. त्याच्याबरोबर अन्य दोन मित्र होते. २.३० च्या दरम्यान पोहताना राजचा बुडून मृत्यू झाला. याबाबत वडील संतोष टेमकर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार हवालदार एस.एस. मांडवकर अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The young swim of the swimming pool