खेडमध्ये युवा सैनिक-भाजप कार्यकर्ते आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:36 IST2021-08-25T04:36:25+5:302021-08-25T04:36:25+5:30
खेड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध करण्यासाठी खेड शहरातील हुतात्मा कान्हेरे चौक येथे युवा सैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी जाेरदार ...

खेडमध्ये युवा सैनिक-भाजप कार्यकर्ते आमने-सामने
खेड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध करण्यासाठी खेड शहरातील हुतात्मा कान्हेरे चौक येथे युवा सैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. त्याचवेळी भाजप कार्यकर्ते तेथे पोहोचल्याने वातावरण काहीकाळ तणावाचे बनले होते. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली; परंतु घटनास्थळी पोलीस पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणे यांच्या निषेधार्थ हुतात्मा कान्हेरे चौक येथे आंदोलन केले. हातात भगवे झेंडे व कोंबड्या घेऊन नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे व काही कार्यकर्ते तेथे पोहोचले. भाजप कार्यकर्त्यांनी युवा सैनिकांना घोषणा देण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, युवासैनिकांनी आक्रमक होत ‘आमच्या पक्षप्रमुखांविषयी कोणी काही बोलेल तर ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देऊ’, असे ठणकावून सांगत घोषणा सुरूच ठेवल्या. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही नारायण राणे यांच्या जयजयकार करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काहीकाळ वातावरण तणावग्रस्त बनले होते. पोलिसांनी आंदोलनस्थळी पोहोचवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.