रेल्वेत तरुणाची बॅग लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:23+5:302021-06-18T04:22:23+5:30

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञाताने तरुणाची बॅग लांबवून सुमारे ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा ...

The young man's bag stretched out on the train | रेल्वेत तरुणाची बॅग लांबवली

रेल्वेत तरुणाची बॅग लांबवली

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञाताने तरुणाची बॅग लांबवून सुमारे ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार, १५ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजण्याचा सुमारास डेहराडून कोच्युवेली एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या अलीकडे घडली.

याबाबत कुणालकुमार संजीव शर्मा (२३, मूळ रा. बिहार, सध्या रा. रत्नागिरी रेल्वेस्टेशन) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. संजीव शर्मा मंगळवारी डेहराडून एक्स्प्रेसने सुरत ते रत्नागिरी असा प्रवास करत होते. गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशनच्या अलीकडे आली असता ते बोगीतील बाथरुममध्ये गेले. ही संधी साधत अज्ञाताने त्यांची बॅग लांबवली. त्यामध्ये रोख ३० हजार, ४० हजार रुपयांचा लॅपटॉप आणि ९ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

Web Title: The young man's bag stretched out on the train