राजापूर : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) हा जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडली.या पुलाखाली असलेल्या दगडावर आपटून गंभीर दुखापत झाल्याने हा दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला आहे. दुचाकीस्वार हा राजापूरकडून भू गावाकडे जात असताना हा अपघात घडला. भरधाव वेगात असलेला हा दुचाकीस्वार या मार्गावर हर्डी कातळडा थबधब्यानजीक आला असताना त्याला दुचाकी आवरता न आल्याने तो थेट रस्ता सोडून या पुलावर खाली कोसळल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलीस हवालदार बबन जाधव, प्रमोद वाघाटे, सागर कोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर नगरसेवक सौरभ खडपे, आंबेवाडीतील सतीश बंडबे, संतोष कातकर, मंदार बंडबे, भास्कर कुवळेकर, दादू बोटले आदींसह या परिसरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनाम्यानंतर पोलीसांनी सौरभ याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रूग्णलयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
दुचाकी पुलावरून कोसळून तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 19:42 IST
Rajapur, Bike, Accident, Ratnagiri भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात गौरव मिलिंद जाधव (२३, रा. भू बौद्धवाडी, राजापूर) हा जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान हर्डी कातळडा धबधब्यानजीक घडली.
दुचाकी पुलावरून कोसळून तरुण जागीच ठार
ठळक मुद्देदुचाकी पुलावरून कोसळून तरुण जागीच ठारपुलाखाली असलेल्या दगडावर आपटून गंभीर दुखापत