अंजनवेल येथील नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST2021-07-14T04:36:54+5:302021-07-14T04:36:54+5:30

गुहागर : मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढून त्यातून तरुण वाहत गेल्याची घटना गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे रविवारी दुपारी ...

Young man drowns in river at Anjanvel | अंजनवेल येथील नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

अंजनवेल येथील नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

गुहागर : मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढून त्यातून तरुण वाहत गेल्याची घटना गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे रविवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. केतन नवनाथ भाेसले (३५, रा. आरे, गुहागर) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अंजनवेल येथे नदीवर बंधारे बांधण्यात आले आहेत. याठिकाणी नदीत पोहण्यासाठी तालुक्यातून अनेकजण पावसाळ्यामध्ये येतात. रविवारी केतन भोसले व त्याचे मित्र पोहण्यासाठी गेले होते. गेले दोन दिवस सतत पाऊस पडत असल्याने नदीचा प्रवाह मोठा होता, याचा अंदाज न आल्याने केतन हा प्रवाहाबरोबर वाहून गेला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता, ताे सापडला नाही. याबाबत आरे ग्रामस्थांना माहिती मिळताच सायंकाळी नदीकिनारी शोध घेतला असता, केतनचा मृतदेह सापडला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. याबाबत गुहागर पोलीस स्थानकात नाेंद करण्याचे काम सुरू हाेते.

Web Title: Young man drowns in river at Anjanvel