विनयभंगप्रकरणी लांजात तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:00+5:302021-03-20T04:31:00+5:30

लांजा : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाटेत गाठून तिचा विनयभंग करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला लांजा पोलिसांनी अटक केली आहे. ...

Young man arrested for molestation | विनयभंगप्रकरणी लांजात तरुणाला अटक

विनयभंगप्रकरणी लांजात तरुणाला अटक

लांजा : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाटेत गाठून तिचा विनयभंग करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला लांजा पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, बुधवारी इयत्ता नववीमध्ये शिकणारी मुलगी शाळेत जात असताना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शिपोशी येथील अरुण दत्ताराम सुतार याने तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर हा तरुण तेथून पळून गेला. पीडित मुलीने घरी जाऊन हा प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यानंतर बुधवारी रात्री मुलीच्या तालुका विधि समितीच्या सदस्य स्वप्ना सावंत यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेली. त्यानंतर याप्रकरणी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांनी संशयित अरुण सुतार याला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्वेता पाटील करीत आहेत.

Web Title: Young man arrested for molestation