स्वातंत्र्य दिनाचे आज थेट प्रक्षेपण पाहता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:32 IST2021-08-15T04:32:29+5:302021-08-15T04:32:29+5:30
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ ...

स्वातंत्र्य दिनाचे आज थेट प्रक्षेपण पाहता येणार
रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ रविवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते होणार आहे.
या समारंभास सर्व शासकीय- निमशासकीय कार्यालये, स्थानिक संस्था आणि शासन अंगीकृत संस्था येथील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच स्वातंत्र्यसैनिक, मान्यवर व्यक्ती, इतर नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
मुख्य शासकीय समारंभास जास्तीत जास्त व्यक्तींना भाग घेता यावा, यासाठी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. एखाद्या संस्थेला अथवा कार्यालयाला ध्वजारोहण कार्यक्रम करावयाचा असल्यास सकाळी ८.३५ पूर्वी अथवा ९.३५ नंतर करता येईल, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण...
स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा कोविड नियमांचे पालन करून होत असल्याने केवळ निमंत्रितांना उपस्थित राहणे शक्य आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घरी बसून फेसबुक आणि यू-ट्यूब या माध्यमातून याचे थेट प्रक्षेपण घरबसल्या पाहता येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबुक पेजवरही हे प्रक्षेपण नागरिकांना बघता येईल.