तुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक -अनंत गीते, वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 01:44 PM2021-02-17T13:44:45+5:302021-02-17T13:48:47+5:30

Anant Geete Shiv Sena Ratnagiri- राज्यात असलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे विधान माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार अनंत गीते यांनी केले. शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

You are not a leading soldier, a Shiv Sena soldier - Anant Geete | तुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक -अनंत गीते, वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

तुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक -अनंत गीते, वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Next
ठळक मुद्देतुम्ही आघाडीचे सैनिक नाही, शिवसेनेचे सैनिक ; गीते यांची स्पष्टोक्तीमहाआघाडी फक्त सत्तेसाठीच, वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या

असगोली/रत्नागिरी : राज्यात असलेल्या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे, असे स्पष्ट करून आपण शिवसैनिक आहोत, आघाडी सैनिक नाही आहोत, असे विधान माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार अनंत गीते यांनी केले. शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना गीते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख बाबू सावंत, चिपळूण तालुकाप्रमुख संदीप सावंत, पंचायत समिती सदस्या पूर्वी निमुणकर, रवींद्र आंबेकर, शृंगारतळी शहरप्रमुख नरेश पवार, नारायण गुरव, पाटपन्हाळे सरपंच संजय पवार व प्रमुख पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

भाषणाच्या सुरुवातीला अनंत गीते यांनी कोरोना काळातील प्रसंगांचा उल्लेख करून याची भयानकता व घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, राज्यातील तीन पक्षांचे आघाडी सरकार असल्यामुळे आपण नेमके कुणाशी लढायचे, असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. या कारणाने शिवसैनिकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी मी आलो आहे.

हे सरकार केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहे. मात्र, आपण शिवसैनिकच आहोत, आघाडी सैनिक नाही असे स्पष्ट करून, पुढील कोणत्याही निवडणुकांत स्वबळावर आपण ताकद दाखविणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोठेही आघाडी झालेली मला पाहायला मिळालेली नाही. तसे मी स्वबळावर लढावे असे आदेशही दिले होते. त्यामुळेच राज्यात ३,३०० इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतल्या असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ते म्हणाले की, शिवसेनेचा जो शाखाप्रमुख माझ्याकडे येईल आणि मला बोलेल की, हा मेळावा माझ्या गावी घ्या, त्याचवेळी मी त्याच्या गावामध्ये मेळावे घेईन. कुणावरही मेळाव्याची जबरदस्ती करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक तालुक्यामध्ये मी असे मेळावे घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जी संभ्रमावस्था आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी त्यांनी आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवाचे कौतुक करून, असे महोत्सव शिवसेनेच्या माध्यमातून सर्वत्र होण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असे सांगितले.

म्हणून ते आले नाहीत

अनंत गीते यांनी या मेळाव्यात आघाडी सरकारमधील कोणत्याही नेत्यावर भाष्य केले नाही. मात्र, आज अनेक नेत्यांचे दौरे या तालुक्यात होणार होते. मी येणार हे समजल्यावर ते आलेले नसावेत, असा चिमटा त्यांनी यावेळी काढला.

Web Title: You are not a leading soldier, a Shiv Sena soldier - Anant Geete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.