लीगल एड आणि महाजनी फाऊंडेशनतर्फे योग सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:44+5:302021-06-24T04:21:44+5:30

रत्नागिरी : रत्नागिरीतील लीगल एड आणि महाजनी फाऊंडेशन यांच्यातर्फे दि. १४ ते २१ जून या कालावधीत योग सप्ताहाचे आयोजन ...

Yoga Week by Legal Aid and Mahajani Foundation | लीगल एड आणि महाजनी फाऊंडेशनतर्फे योग सप्ताह

लीगल एड आणि महाजनी फाऊंडेशनतर्फे योग सप्ताह

रत्नागिरी : रत्नागिरीतील लीगल एड आणि महाजनी फाऊंडेशन यांच्यातर्फे दि. १४ ते २१ जून या कालावधीत योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध संस्थांचा सहभाग होता.

सध्याच्या धकाधकीच्या काळात त्याचप्रमाणे कोरोना महामारीच्या काळात योग, प्राणायाम यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. यादृष्टीने जागतिक योग दिनानिमित्त या योग सप्ताहात लीगल एड आणि महाजनी फाऊंडेशन यांच्यातर्फे दि. १४ ते २१ जून या कालावधीत योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात रत्नागिरीतील बाल निरीक्षणगृह, ओणी (ता. राजापूर) येथील मुलांची आश्रमशाळा, लांजा येथील मुलींची आश्रमशाळा, देवरुख येथील मुलींचे वसतिगृह, रत्नागिरी येथील माहेर अशा ५ संस्था सहभागी झाल्या होत्या.

यावेळी या सर्व संस्थांमधील मुलां -मुलींनी आसनांची उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर करून जागतिक योग दिवस साजरा केला.

Web Title: Yoga Week by Legal Aid and Mahajani Foundation