कोरोना काळात योगा ठरतोय महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:30+5:302021-05-27T04:33:30+5:30
रत्नागिरी : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला प्रतिकार करायचा असेल तर यासाठी सद्यस्थितीत योग प्राणायाम करणे उपयुक्त ...

कोरोना काळात योगा ठरतोय महत्त्वाचा
रत्नागिरी : कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला प्रतिकार करायचा असेल तर यासाठी सद्यस्थितीत योग प्राणायाम करणे उपयुक्त ठरत आहे.
योगसाधना अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली ही साधना आहे. आजच्या घडीला हाच योग प्राणायाम मानवासाठी लाभदायक व महत्त्वाचा ठरत आहे. कोराेनामुळे शरीरातील प्राणवायूची मात्रा कमी होते. त्यामुळे नियमित योग प्राणायाम केल्यास फुफ्फुसाची क्षमता वाढून प्राणवायूची मात्रा वाढते; मात्र हे करताना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक असल्याचे मत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग शिक्षिका सोनिया शिर्के यांनी व्यक्त केले.
योग-प्राणायाम भारतीय संस्कृतीत पाच हजार वर्षापासून चालत आलेली साधना आहे. जर एखाद्याला कोरोनाची बाधा झाली असेल व त्याने योगा केल्यास प्राणवायूची मात्रा योग्य प्रमाणात मिळाल्यास मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो. योगप्राणायाम हे नियमित केले तर आपले शरीर निरोगी राहते. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य स्थितीत ठेवते. फुफ्फुस निरोगी ठेवते. आपले मन ताणतणावापासून दूर ठेवण्यासाठी मदत होते, असे योग प्राणायामचे अनेक फायदे होत आहेत, असेही साेनिया शिर्के यांनी सांगितले.