खापणे महाविद्यालयात योग दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST2021-06-26T04:22:26+5:302021-06-26T04:22:26+5:30

राजापूर : तालुक्यातील पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग ...

Yoga day in eating college | खापणे महाविद्यालयात योग दिन

खापणे महाविद्यालयात योग दिन

राजापूर : तालुक्यातील पाचल येथील श्री मनोहर हरी खापणे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

सकाळच्या प्रथम सत्रात नीता मांडवकर यांनी योगासंबंधी ऑनलाईन माहिती दिली़ त्याचबरोबर काही प्रात्यक्षिकेही करून दाखवली़ कोल्हापूर येथील पतंजली योग संस्थेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला हाेता़ यामध्ये सुप्रिया निंबाळकर यांनी योगासंबंधी माहिती दिली. मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ऑनलाईन योग प्रशिक्षणातही विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, डॉ. सुधीर वाघमारे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवक सहभागी झाले होते.

Web Title: Yoga day in eating college