हॉ टे ल्स
By Admin | Updated: July 6, 2014 23:55 IST2014-07-06T23:48:21+5:302014-07-06T23:55:22+5:30
पर्यटनकेंद्रीत संकल्प हवा...

हॉ टे ल्स
रत्नागिरी : हॉटेल व्यवसायात वृध्दी आणायची असेल तर पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे. त्यासाठी अर्थसंकल्पात पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न दिसणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हॉटेलसाठी विविध ‘संकल्प’ असणे गरजेचे असल्याचे मत जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.
आगामी अर्थसंकल्पाविषयी हॉटेल व्यावसायिकांच्या मनाचा कानोसा घेतला असता अनेकांनी पर्यटन वृध्दीवरच बोलणे पसंत केले. हॉटेल व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी पर्यटनाचा हातभार लागणे महत्त्वाचे आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील लोकं रत्नागिरीकडे वळतील आणि त्याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना मिळू शकेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांसाठी जाचक कर आकारण्यात येत आहे. तो कमी होणे गरजेचे आहे. हा सेवाकर कमी झाल्यास सेवा देताना ग्राहकांना त्या अत्यल्प दरात देणे सोयीस्कर होईल, असे हॉटेल व्यावसायिकांना वाटते.
केरळ, गोव्यासारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढले आहे. त्यामुळे तेथे हॉटेल व्यवसाय बहरलेला दिसून येतो. रत्नागिरीकडेही पर्यटन वाढत आहे. मात्र, ते म्हणावे तेवढ्या प्रमाणात वाढलेले नाही, त्यावर अर्थसंकल्पात भर दिला गेल्यास रत्नागिरी जिल्ह्यातही हॉटेल व्यवसायाला चांगले दिवस येतील, अशी आशा या व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सीआरझेडच्या कायद्यामुळे सागरकिनारी हॉटेल व्यवसाय उभारण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कोकणला बीच लाभूनही त्याचा वापर करता येत नाही, त्यावरही उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.