शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

होय! मुलांची मानसिकता बदलते आहे, स्पर्धा परीक्षांना वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 15:53 IST

आजवर स्पर्धा परीक्षांमध्ये रत्नागिरीतील तरूणांचा सहभाग कमी होता. मात्र, आता तो वाढू लागला आहे. त्याबाबत आता विद्यार्थी सकारात्मक आहेत आणि पालकही.

ठळक मुद्देहोय! मुलांची मानसिकता बदलते आहे, स्पर्धा परीक्षांना वाढता प्रतिसादरत्नागिरीतील विद्यार्थी, पालक परीक्षांबाबत होत आहेत सकारात्मक

मनोज मुळ्येरत्नागिरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण रत्नागिरीतील संकेत देवळेकर या तरूणाची राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती... रिझवाना ककेरी झाली रत्नागिरीतील पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक... गेल्या महिन्यातील या दोन घटनांनी रत्नागिरीला अभिमान मिळवून दिला आणि प्रकर्षाने पुढे आली ती तरूणांची आणि पालकांची विचारांची बदललेली दिशा.

आजवर स्पर्धा परीक्षांमध्ये रत्नागिरीतील तरूणांचा सहभाग कमी होता. मात्र, आता तो वाढू लागला आहे. त्याबाबत आता विद्यार्थी सकारात्मक आहेत आणि पालकही.कोकणात बुद्धिमत्ता असूनही कोकणातील तरूण स्पर्धा परीक्षांच्या वाट्याला जात नव्हते. टक्केवारीत वरच्या स्तरावर असलेली आणि स्पर्धा परीक्षांचे ध्येय बाळगणारी मुले शिक्षणासाठी बाहेरगावी जात होती. अजूनही जात आहेत. मात्र रत्नागिरीत राहूनच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचे प्रमाण अल्प होते. आता त्यात बदल होत आहे.

अरूअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीसारख्या काही संस्थांनी मार्गदर्शन केंद्रांवर भर दिला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे.स्पर्धा परीक्षा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि लोकसेवा आयोग, हीच बहुतांकांची संकल्पना. फार तर बँकांच्या परीक्षा. पण त्याहीपलिकडे असंख्य परीक्षा देऊन सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळवता येऊ शकते, याची कल्पना तरूणांना नसते.

त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या वाट्याला फारजण जात नाहीत, असा रत्नागिरी जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांचा अनुभव. मात्र आता त्यात बदल होऊ लागला आहे. विद्यार्थी - पालक दोघांमध्येही हा बदल दिसत आहे. रत्नागिरीतच राहून परीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या मुलांची संख्या वाढू लागली आहे. 

रत्नागिरीतील मुलांमध्ये बुद्धीमत्ता आहे. मात्र, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि ध्येयाने एखादी गोष्ट करण्याची तयारी कमी पडते. फक्त लिपिक पदासाठीच्या परीक्षा देण्यापेक्षा मुलांनी अधिकारी पदाच्या परीक्षांवर भर द्यायला हवा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता त्याला यशही येऊ लागले आहे.- अ‍ॅड. इंदुमती मलुष्टेसमन्वयक, अरूआप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी

भारंभार पुस्तकं वाचणे, फक्त पाठांतर करणे यापेक्षा प्रश्नपत्रिका नेमकी कशी असते, कुठल्या पुस्तकांआधारे प्रश्न येतात, याचा विचार करून नेमकेपणाने अभ्यास करायला हवा. मी शाळेत होतो, तेव्हापासूनच काही गोष्टी मनाशी ठाम होत्या. चार भिंतींमध्ये महिलांना होणारी मारहाण, महिलांवरील अत्याचार याविषयीची चीड लहानपणापासून होती. त्यामुळे युनिफॉर्मवाली पोस्ट मिळवणे ही खूप काळ मनात रूजलेली गोष्ट होती. त्यादृष्टीनेच मी पहिल्यापासून प्रयत्न केले आणि मला युनिफॉर्म मिळवण्यात यश आले. माझ्याबाबत माझे बाबा नथुराम देवळेकर, आई नीता, मावशी सुनीता सावर्डेकर, काका महादेव सावर्डेकर आणि सुनील आडिवरेकर यांनी या परीक्षेसाठी सर्व प्रकारचा पाठिंबा दिला. त्यामुळेच माझा मार्ग सुकर झाला.- संकेत देवळेकर, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक

परिस्थिती गरिबीची असतानाही आई-वडील आपल्याला शिकवत आहेत तर त्यांच्या कष्टाचं चीज व्हायला पाहिजे, असं शाळेत असल्यापासूनच वाटायचं. तेव्हाच ठरवलं होतं, आपण अधिकारी व्हायचं. कॉलेजला गेल्यापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरूवातीला कोणीही सोबत नव्हतं. अभ्यास काय करायचा, कसा करायचा, कुठली पुस्तकं वाचायची, याबाबत कसलीच माहिती नव्हती. मात्र, स्वत:च त्याबाबतची माहिती घेत घेत मी शिकत गेले. त्यादरम्यान ज्या काही कार्यशाळा झाल्या त्या चुकवल्या नाहीत. १२-१३ तास अभ्यास करायची सवय लावून घेतली. त्यामुळे हे ध्येय गाठता आलं. अधिकाधिक मुलं स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. मुळात आपल्याला काय व्हायचंय, हे ध्येय निश्चित करून घ्यायला हवं आणि त्यानंतर त्यासाठी तेवढाच अभ्यास करायला हवा.- रिझवाना ककेरी,पोलीस उपनिरीक्षक

३८ मुले नोकऱ्यांमध्येगेल्या चार वर्षात रत्नागिरीतील १५00हून अधिक मुलांनी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतला आहे. त्यातील ३८ मुले वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीत रूजू झाली आहेत. सद्यस्थितीत ही टक्केवारी खूप मोठी वाटत नसली तरी ही चांगली सुरूवात आहे. त्यातून पुढच्या मुलांना सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. आता अशा परीक्षांचे महत्त्व मुलांना कळू लागले आहे. त्यामुळे ही टक्केवारी येत्या दोन वर्षात खूप वाढेल, असा विश्वास अ‍ॅड. इंदुमती मलुष्टे यांनी व्यक्त केला.वर्षभरात महाभरतीराज्य सरकारने २०१९पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन महाभरतीचे नियोजन सुरू केले आहे. तसा शासन निर्णयही जाहीर झाला आहे. या मोहिमेमध्ये यंदा आणि पुढील वर्षी मिळून राज्यात विविध खात्यांमध्ये ६० ते ७० हजार इतकी पदे भरली जातील. त्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एकच मार्ग आहे.

नगर परिषदा, महिला बालकल्याण यासह सर्वच खात्यांमधील रिक्त होणाºया पदांचा आढावा घेतला जात आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य वेळेतच स्पर्धा परीक्षेकडे वळावे, असे मत अ‍ॅड. इंदुमती मलुष्टे यांनी व्यक्त केले.आॅनलाईन प्रक्रियेमुळे विश्वासार्हतास्पर्धा परीक्षांबाबत विशेषत: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत काही वर्षे संभ्रमाची स्थिती होती. तक्रार केली तर त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. योग्य माहिती मिळत नव्हती. मात्र, आता सर्व प्रक्रिया आॅनलाईन असल्यामुळे ती अधिक सुकर झाली आहे. विश्वासार्ह झाली आहे. या परीक्षांकडे विद्यार्थी वळण्यामध्ये हे एक महत्त्वाचे कारण आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाRatnagiriरत्नागिरी