यावर्षीही अनेकांच्या घरी भटजीविनाच गणरायाची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:39 IST2021-09-10T04:39:09+5:302021-09-10T04:39:09+5:30
अरुण आडिवरेकर / रत्नागिरी : याहीवर्षी गणेशाेत्सवावर काेराेनाचे सावट राहिले आहे. त्यातच काेराेना प्रतिबंधक लसीचे डाेस पूर्ण न झालेल्या ...

यावर्षीही अनेकांच्या घरी भटजीविनाच गणरायाची प्रतिष्ठापना
अरुण आडिवरेकर / रत्नागिरी : याहीवर्षी गणेशाेत्सवावर काेराेनाचे सावट राहिले आहे. त्यातच काेराेना प्रतिबंधक लसीचे डाेस पूर्ण न झालेल्या भटजींनी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर आराेग्याच्या काळजीपाेटी काही नागरिकांनी भटजीविना गणेश प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे याहीवर्षी अनेकांच्या घरी भटजीविना गणरायाची प्रतिष्ठापना हाेणार आहे.
गणेश चतुर्थीला घराेघरी भटजींच्या हस्ते पूजाविधी करून गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते. त्यामुळे सकाळपासूनच घराेघरी लगबग सुरू झालेली असते. गतवर्षी काेराेनाच्या पहिल्या लाटेत काेराेनाची रुग्णसंख्या अधिक राहिल्याने भटजींनी घराेघरी जाणे टाळले हाेते. तर काहींनी गणेशभक्तांच्या हट्टापायी पीपीई किट घालून पूजा सांगितली हाेती. काहींनी स्वत:च गणरायाची पूजा केली हाेती. काेराेनाचे संक्रमण अजूनही कमी झालेले नाही. त्यामुळे याहीवर्षी गणेशाेत्सव काेराेनाच्या निर्बंधांमध्ये साजरा करावा लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावलीही जाहीर केली आहे. त्यातच काेराेना प्रतिबंधक लसीची निर्मिती केल्यानंतर काेविशिल्ड आणि काेवॅक्सिन हे दाेन डाेस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ८ लाख २१ हजार डोस देण्यात आले आहेत. यापैकी पहिला डोस ५ लाख ७५ हजार तर २ लाख ४६ हजार ४३२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
लसीचा तुटवडा, त्यातच ऑनलाईन नाेंदणीत येणारे अडथळे यामुळे अनेकांना लस मिळण्यास विलंब हाेत आहे. त्यातही पाैराेहित्य करणाऱ्या सर्वच भटजींनी लसीच्या दाेन्ही मात्रा घेतलेल्या नाहीत. त्यामुळे गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी अनेकांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही गणेशभक्तांकडून काेराेनाच्या भीतीमुळे भटजींना न येण्याची सूचना केली आहे. या साऱ्यामुळे यावर्षीही भटजीविनाच गणरायाची प्रतिष्ठापना करावी लागणार आहे.
--------------------------
गतवर्षी कोरोनाची जी परिस्थिती होती, त्या तुलनेत यावर्षीची खूप नियंत्रणात आहे. तरीही सर्वच भटजी खबरदारी घेऊन पूजापाठ करत आहेत. सर्वांनी लसीकरणाचे डोस घेतले असून, पूजापाठ करण्यासाठी जाताना संबंधित कुटुंबांची चौकशी करूनच तेथे जात आहेत. काही कुटुंब स्वतःहून येऊ नका, असे सांगतात. त्यामुळे काही ठिकाणचा पूजापाठ रद्दही झाला आहे.
- विठ्ठल चितळे, चिपळूण.