गतिमंद मुलास मारहाण प्रकरणी चौघांना वर्षाची सक्तमजुरी

By Admin | Updated: March 7, 2017 17:34 IST2017-03-07T17:34:27+5:302017-03-07T17:34:27+5:30

एक वर्षाची सक्तमजुरी व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा

Year-old boy | गतिमंद मुलास मारहाण प्रकरणी चौघांना वर्षाची सक्तमजुरी

गतिमंद मुलास मारहाण प्रकरणी चौघांना वर्षाची सक्तमजुरी

गतिमंद मुलास मारहाण प्रकरणी चौघांना वर्षाची सक्तमजुरी

चिपळूण : तालुक्यातील शिरगाव येथील गतिमंद मुलास मारहाण केल्याप्रकरणी चौघांना दुसऱ्या न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश जाधव यांनी एक वर्षाची सक्तमजुरी व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
महेश भीमराव आरते, शुभांगी भीमराव आरते, राजश्री भीमराव आरते, सुमन गणपत वायकर या चार आरोपींनी दि. १८ मे २०१४ साली गतिमंद मुलगा संजय भोसले यास बेदम मारहाण केली होती. त्यानुसार त्याचे वडील विष्णू भोसले यांनी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल झालेल्या दोषारोप पत्रानुसार या गुन्ह्याची सुनावणी चिपळूण न्यायालयात सुरु होती. अखेर दिवाणी न्यायाधीश जाधव यांनी चौघांना एक वर्ष सक्तमजुरी व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ८ हजार रुपये दंडापैकी ६ हजार रुपये हे मारहाण झालेल्या संजयला तर २ हजार रुपये शासन तिजोरीत जमा करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे. याकामी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमोल वीरकर यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.