यशवंत देसाई यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST2021-07-08T04:21:28+5:302021-07-08T04:21:28+5:30

रत्नागिरी : हातखंबा येथील शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते तसेच आदर्श शेतकरी सन्मानप्राप्त यशवंतराव आत्माराम देसाई (९२) यांचे हातखंबा ...

Yashwant Desai passes away | यशवंत देसाई यांचे निधन

यशवंत देसाई यांचे निधन

रत्नागिरी : हातखंबा येथील शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्ते तसेच आदर्श शेतकरी सन्मानप्राप्त यशवंतराव आत्माराम देसाई (९२) यांचे हातखंबा येथे निधन झाले.

विवेकानंद शिक्षण संस्थेचे हितचिंतक, गुरूवर्य अ. आ. देसाई यांचे बंधू, हातखंबा ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राध्यापक चंद्रमोहन देसाई यांचे ते वडील होत. यशवंत देसाई यांनी आदर्श तालुका मास्तर म्हणून नावलौकिक मिळवला होता. गुरूवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिर आणि श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर ज्युनिअर कॉलेज, हातखंबाचे पालक संघ उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

जिल्हा परिषदने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन १९८० साली त्यांचा गौरव केला होता. आदर्श शेतकरी म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी हातखंबा येथील स्मशानभूमीत दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Yashwant Desai passes away