घराचे बांधकाम करताना पडून कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST2021-03-21T04:29:35+5:302021-03-21T04:29:35+5:30

रत्नागिरी : घराचे बांधकाम करताना ७ फुटावरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी मृत्यू ...

Worker dies after falling while constructing a house | घराचे बांधकाम करताना पडून कामगाराचा मृत्यू

घराचे बांधकाम करताना पडून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : घराचे बांधकाम करताना ७ फुटावरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी तालुक्यातील हातखंबा-सनगरेवाडी येथे घडली. भालचंद्र गुणाजी नागले (वय ५५, रा. चरवेली, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र गुणाजी नागले गुरुवारी हातखंबा येथे घराचे बांधकाम करत होते. काम करत असताना त्यांचा ताेल गेला आणि ते उंचावरून खाली पडले. यावेळी खाली असणाऱ्या चिऱ्याच्या दगडावर त्यांचे डाेके आदळून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचा मुलगा शैलेंद्र भालचंद्र नागले (२६) याने ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Worker dies after falling while constructing a house