चिपळुणातील शिवपुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:30 IST2021-03-21T04:30:26+5:302021-03-21T04:30:26+5:30
चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशाेभीकरणाच्या कामाची नगराध्यक्ष सुरेखा खराडे यांनी पाहणी केली. (छाया : संदीप ...

चिपळुणातील शिवपुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू
चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशाेभीकरणाच्या कामाची नगराध्यक्ष सुरेखा खराडे यांनी पाहणी केली. (छाया : संदीप बांद्रे)
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरात गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अखेर पुन्हा सुरू झाले आहे. या कामाची नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी शनिवारी पाहणी केली व दर्जेदार काम करण्याच्या सूचना ठेकेदार व आर्किटेक्ट पॅनलला दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षे होत आहे. त्याप्रमाणे वेस मारुती मंदिराशेजारील अनंत आईस फॅक्टरीलगत हा पुतळा उभारला जात आहे. मार्च महिन्यात या कामाचा शुभारंभ करून सभोवती संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू केले होते; परंतु या कामासाठी सिमेंट काँक्रिट मशीन मिक्सऐवजी हाती सिमेंट मिश्रण केलेले वापरले जात होते. त्यावरून मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेऊन हे काम बंद पाडले होते. अनेक महिने हे काम बंद राहिल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडीही वाढली होती. मात्र, आता पुन्हा नव्याने काम सुरू करण्यात आले आहे.
या कामाची नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेवक आशिष खातू, वर्षा जागुष्टे, शिवानी पवार, विजय चितळे आदींनी पाहणी केली. यावेळी नगर अभियंता परेश पवार, आर्किटेक्ट देसाई व ठेकेदार प्रतिनिधी प्रकाश पवार यांना दर्जेदार कामाविषयी सूचना केल्या.