शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बोरज येथील टोलनाक्याचे काम मार्च अखेर पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:46 IST

लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कामगार परत आल्याने मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देबोरज येथील टोलनाक्याचे काम मार्च अखेर पूर्ण होणार६० टक्के काम पूर्ण, कामगार परतल्याने कामाला वेग

खेड : लॉकडाऊनच्या काळात गावी गेलेले कामगार परत आल्याने मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. महामार्गावरील बोरज ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात येत असलेल्या टोल नाक्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.

सर्व आवश्यक सुविधांसह हा टोलनाका मार्च २०२१ अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात दिल्या जाईल, अशी माहिती महामार्ग चौदपरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत बकले यांनी दिली.महामार्गावरील कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटर महामार्गाचे काम कल्याण टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले आहे. कंपनीकडून ४४ किलोमीटरपैकी सुमारे ३० किलोमीटरचे काम पूर्णत्वाला गेले आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणचे काम रखडले आहे. मात्र, मे २०२१ अखेर कशेडी ते पशुराम दरम्यानच्या ४४ किलोमीटर महामार्गाचे काम पूर्णत्वाला जाईल, असे कंपनीकडून सांगितले जात आहे.लॉकडाऊन दरम्यान चौपदरीकरणाचे काम करणारे परप्रांतीय कामगार निघून गेल्याने कामामध्ये थोडी शिथिलता आली होती. मात्र, निघून गेलेले कामगार आता पुन्हा परतले आहेत. त्यामुळे पाऊस थांबताच चौदपरीकरणाचे काम पुन्हा युद्धपातळीवर सुरु करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.पोलिसांसाठी स्वतंत्र कक्षबोरज येथील टोलनाक्यावर वाहनांना ये-जा करण्यासाठी प्रत्येकी ८ अशा १६ लाईन्स असणार आहेत. कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाRatnagiriरत्नागिरीpwdसार्वजनिक बांधकाम विभागhighwayमहामार्ग