शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: अणुस्कुरा घाटातील दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर, दुचाकी वाहतूक सुरू

By मनोज मुळ्ये | Updated: June 14, 2024 14:26 IST

रत्नागिरी : पाऊस नियमित सुरू होण्याआधीच राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली आणि कोल्हापूरकडे जाणारा हा घाट ...

रत्नागिरी : पाऊस नियमित सुरू होण्याआधीच राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गुरुवारी रात्री दरड कोसळली आणि कोल्हापूरकडे जाणारा हा घाट बंद झाला. शुक्रवारी दुपारपर्यंत येथे ब्लास्टिंगचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी अजूनही पूर्ण मार्ग मोकळा झालेला नाही.गेली अनेक वर्षे पावसाळ्यात दरडी कोसळणारा मार्ग अशीच अणुस्कुरा घाटाची ओळख आहे. राजापूर तालुक्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. गुरुवारी रात्री या घाटात भलीमोठी दरड रस्त्यावर आली आणि मार्ग बंद झाला. दरड मोठी असल्याने सकाळपर्यंत मारर्ग बंद राहील, हे आधीच जाहीर करण्यात आले. ब्लास करुन दरड फोडण्याचे काम सकाळपासून अखंडितपणे सुरू आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर आलेली मातीही हटवली जात आहे. मात्र दुपारपर्यंत रस्ता पूर्ण मोकळा झाला नव्हता.रस्त्याची एक बाजू साफ करुन दुचाकी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी तो अजूनही नियमित नाही. मात्र तरीही येथे दरड कोसळल्याने मुसळधार पावसात या मार्गाचे काय होणार, याबाबत प्रश्नच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूरlandslidesभूस्खलनTrafficवाहतूक कोंडी