शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Ratnagiri: परशुराम घाटात सुरक्षेची लगीनघाई!, धोकादायक दरडीच्या ठिकाणी जाळीचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:57 IST

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळा जवळ आल्याने ...

चिपळूण : मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळा जवळ आल्याने या कामासाठी लगीनघाई सुरू झाली आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरडीच्या खालच्या बाजूने गॅबीयन वॉल उभारण्याचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.तीन महिन्यांपूर्वी घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबीयन वॉल उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. गॅबीयन वॉलच्या माध्यमातून मजबुतीकरणाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. अजून काही दिवसांत हेही काम पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.

दोन ठिकाणी कृत्रिम धबधबेपरशुराम घाटाच्या पायथ्याशी सर्वांचे आकर्षण असलेला सवतसडा धबधबा पावसाळ्यात धो धो वाहतो. मात्र आता या घाटात नव्या बांधकामामुळे दोन धबधबे तयार झाले आहेत. तेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरतील. मात्र प्रत्यक्षात हे धबधबे नसून घाटात धोकादायक ठिकाणी वाहून येणारे पाणी टप्प्याटप्प्याने खाली यावे व त्याचा वेग व्हावा, या उद्देशाने ही रचना करण्यात आली आहे.

दरड कोसळू नये म्हणून जाळ्यांचा पर्याय

  • या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत. याशिवाय घाटात काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कायम आहे.
  • आता धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जात आहे. खडकात व दरडीच्या भागात लोखंडी सळ्या घुसवल्या जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जात आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

आता या कामाचा वेग आणखी वाढवला असून धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम बहुतांशी पूर्ण होत आले आहे. पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी व गॅबीयन वॉल हे दोन्ही काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या आठवड्यापासून काही प्रमाणात यंत्रणा वाढविण्यात येणार आहे. - पंकज गोसावी, राष्ट्रीय महामार्ग विभाग.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग