शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, शिवसेनेचे २७ जानेवारीला चक्काजाम आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 18:08 IST

काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवणार.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. त्यामागून मंजूर झालेला समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला आहे. ठेकेदार व अधिकारी सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कोकणी माणसाच्या सहनशीलता संपत आली आहे.काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाणार असून, २७ जानेवारी रोजी मुंबई-गोवा महामार्गावर पाच ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.वाकेड ते आरवली हे दोन टप्पे प्रामुख्याने रखडले असून, या क्षेत्रात नऊ ते दहा टक्केच कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महामार्गाच्या कामाबाबत जनतेकडून संताप व्यक्त होत असल्याने केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता लांजा, पाली, हातखंबा, आरवली, चिपळूण या ठिकाणी चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले. खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले जाणार आहे.खासदार राऊत, मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत अनेकवेळा बैठका घेतल्या आहेत. महिनाभरापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महिना उलटूनही ठेकेदाराने लक्ष दिलेले नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे महामार्गाचे काम ठप्पच आहे. त्यामुळे केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेनेबरोबरच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.खेडमध्ये आमदार योगेश कदम, चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव व आमदार निकम, हातखंबा व पाली येथे मंत्री सामंत व लांजात आपण याचे नेतृत्व करणार असल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात खासदार विनायक राऊत स्वत: सहभागी होणार आहेत. यावेळी महामार्गावरील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारीही आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनीही परखड मते व्यक्त केली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वेदा फडके, उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, जगदीश राजापकर, संजू साळवी, रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्गShiv Senaशिवसेना