मग्रारोहयोची जिल्हाभरातील कामे पूर्णपणे ठप्प मजुरांची
By Admin | Updated: September 29, 2014 00:12 IST2014-09-29T00:12:23+5:302014-09-29T00:12:38+5:30
अनुपलब्धता : कागदावरचा आराखडा प्रत्यक्षात कधी येणार

मग्रारोहयोची जिल्हाभरातील कामे पूर्णपणे ठप्प मजुरांची
रहिम दलाल ल्ल रत्नागिरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी मजूर पुढे येत नसल्याने जिल्हाभरात ३३९१ सुरु न झाल्याने ती कागदावरच आहेत़ त्यामुळे या योजनेचे आराखडे कितीही फुगवले तरी ते कागदावरच दिसतात़ मग्रारोहयोमुळे ग्रामीण भागात रोजगार मिळणार आहे़ त्यासाठी अंगमेहनतीची कामे करणे आवश्यक आहे़ या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला वर्षातून १०० दिवस काम मिळणार असल्याने हजारो कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे़ मग्रारोहयोच्या कामांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून ५३०१ प्रस्ताव रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. यामध्ये मंडणगड- ५२२, दापोली ९२६, खेडे ३२५, चिपळूण ७६८, गुहागर ७९५, संगमेश्वर ३४४, रत्नागिरी ४७५, लांजा ५७८, राजापूर ५६८ अशी प्रस्तावांची तालुकानिहाय संख्या आहे़ त्यापैकी ४३२६ प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. मंजूर कामांपैकी ९३५ कामे सुरु करण्यात आली आहे. त्यांची कामनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये विहिरी २०, कुक्कुटपालन शेड १९, शौचालय ७१५, शोषखड्डे ६०, फळबाग लागवड ३७, गाळ काढणे २, रस्ते ६, नेपेड खत गांडूळ खत ३९, खड्डे व वृक्षलागवड १, वृक्षसंगोपन ११ व संरक्षक भिंत ५ या कामांचा समावेश आहे़ जिल्ह्यात ९३५ कामे सुरु असली तरी ३३९१ कामे मजूर पुढे येत नसल्याने ती अजूनही सुरु करण्यात आलेली नाहीत़ मग्रारोहयोमुळे स्थानिक मजुरांना काम मिळणार आहे़ मात्र, केवळ मजुरांची नांवे नोंदविली जात असून, कामे करण्यासाठी स्थानिक मजूर पुढे येत नसल्याने ३३९१ कामे अजूनही सुरु झालेली नाहीत़त्यामुळे आराखडा कागदावरच आहे.(शहर वार्ताहर)