शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 12:35 IST

pwd Chiplun Highway Ratnagiri-गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. बहादूरशेखनाका येथून ही सुरुवात झाली आहे. सिंगल पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल १८३५ मीटर लांबीचा असेल. एकूण ४५ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउड्डाणपूल १८३५ मीटर लांबीचा, ४५ पिलरवर उभारणार उड्डाणपूलतब्बल दोन ते तीनवेळा हे रॉक टेस्टींग

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. बहादूरशेखनाका येथून ही सुरुवात झाली आहे. सिंगल पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल १८३५ मीटर लांबीचा असेल. एकूण ४५ पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणात शहरात उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. वाशिष्ठी नदीजवळ सुरू होणारा हा उड्डाणपूल युनायटेड हायस्कूलजवळ संपणार आहे. सध्या पुलाच्या कामासाठी बहादूरशेखनाका येथे खोदाईला सुरुवात झाली आहे. पुलाच्या पूर्व तयारीसाठी जमिनीत बोअरवेल मारून मातीच्या थराची तपासणी करण्यात आली होती. तब्बल दोन ते तीनवेळा हे रॉक टेस्टींग करण्यात आले होते. त्यानंतर सध्या प्रत्यक्ष पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे.हा उड्डाणपूल केवळ सिंगर पिलरवर उभारण्यात येणार आहे. पुलाची लांबी ही १८३५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी एकूण ४५ पिलर उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पॅन हा ४० मीटरचा राहणार आहे. पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने सर्व्हिस रोडच्या कामानेही वेग घेतला आहे. बहादूरशेख येथील पोलीस चौकी महामार्गात बाधित झाली. चौकीचे बांधकाम तोडून तेथे रस्ता तयार करण्यात आला आहे. बहादूरशेख नाका येथेच एक कंटेनर पोलिसांसाठी ठेवण्यात आला आहे. तेथून पोलिसांचे काम सुरू आहे.बहादूरशेख नाका ते पागपर्यंत सर्व्हिस रोड ठेवला जाणार आहे. त्याचे कामही गतीने सुरू आहे. शहरात काही जमिनी व इमारतींना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे संपादन अजून झालेले नाही. त्याठिकाणी गटाराचे काम काही फूट आतमध्ये घेण्यात आले आहे. सर्व्हिस रोडची कामे ही काही ठिकाणी मार्गी लागली आहेत, तर उर्वरित ठिकाणी ती मार्गी लावली जात आहेत.

युनायटेड हायस्कूलजवळ संपणारा हा उड्डाणपूल पागनाका येथे पॉवर हाऊसपर्यंत नेण्याची मागणी लोकांकडून करण्यात आली होती. त्यासाठी चिपळूणच्या नगर पालिकेने ठराव केला. नागरिकांनी त्यासाठी आंदोलनेही केली; मात्र त्याचा राष्ट्रीय महामार्ग विभागावर काहीच परिणाम झालेला नाही. उड्डाणपुलाच्या कामात कोणताही बदल झालेला नसून, मूळ नियोजित ठिकाणीच हा पूल उभा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.पुलाचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थेत बदल केला जात आहे. पुलाच्या कामाला दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यादृष्टीने पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम मार्गी लागावे, यासाठी ठेकेदार कंपनीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागhighwayमहामार्गChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी