शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: आंजणारी घाटात भरधाव कंटेनरने चिरडले, महिला जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 11:38 IST

पाठलाग करुन चालकाला पकडले

लांजा : मजुरी कामासाठी चालत जाणाऱ्या महिलांना भरधाव कंटेनरने चिरडले. यात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी ८:३० वाजता मुंबई-गाेवा महामार्गावरील आंजणारी घाटात (ता. लांजा) घडली. पल्लवी प्रकाश पेंढारी (४७) असे मृत महिलेचे नाव आहे. तर जयश्री धोंडुराम पेंढारी (५५, दाेघीही रा. आंजणारी पेंढारीवाडी) या गंभीर जखमी झाल्या आहेत.पल्लवी पेंढारी व जयश्री पेंढारी या माेलमजुरी करतात. त्या गुरुवारी आंजणारी पूल येथील चांदोरकर यांच्याकडे मजुरी कामासाठी सकाळी आठ वाजता घरातून निघाल्या. आंजणारी बसथांब्याजवळील तीव्र उतारावरील खिंडीत त्या सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान आल्या. त्याचवेळी लखनौहून गोव्याच्या दिशेने सद्दाम हकमुद्दीन अन्सारी (३६, रा. बिहार, जि. कैमुर भाऊबा, तहसील चैनपूर) हा कंटेनर (एचआर ३८, व्ही ९७९४) घेऊन जात हाेता.आंजणारी घाट उतरल्यानंतर चालत जाणाऱ्या महिलांना कंटेनरची धडक बसली. कंटेनरच्या धडकेने पल्लवी पेंढारी यांच्या अंगावरून कंटेनर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत जयश्री पेंढारी या कंटेनरच्या धडकेने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पाली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पल्लवी पेंढारी यांच्या मृतदेहाचे लांजा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, पोलिस सहायक निरीक्षक प्रवीण देशमुख, हेडकॉन्स्टेबल अरविंद कांबळे, साक्षी भुजबळराव, रहिम मुजावर, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव, गिरी गोसावी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या अपघाताचा पंचनामा केला. कंटेनरचालक सद्दाम हकमुद्दीन अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंटेनरचालकाचा पाठलागअपघातानंतर कंटेनरचालक सद्दाम अन्सारी याने घटनास्थळावरून पळ काढला. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून देवधे (ता. दापाेली) येथे पकडला. त्यानंतर त्याला पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.आईचे छत्र हरवलेअपघाती मृत्यू झालेल्या पल्लवी पेंढारी यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा आहे. एक मुलगी बारावी झाली असून, दुसरी बारावीत शिकत आहे तर मुलगा दहावीत आहे. आईचे छत्र हरपल्याने ही मुले पाेरकी झाली आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात