शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: लाकडे गोळा करायला गेलेल्या महिलेवर बिबट्याने केला हल्ला, धाडसाने प्रतिकार करत जीव वाचवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:36 IST

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

सचिन मोहितेदेवरुख : तीन महिला लाकडे आणण्यासाठी गावानजीकच्या जंगलात गेल्या होत्या. त्यातील एक महिला समोर दिसणारी सुकी लाकडे ओढू लागली. ही चाहूल लागताच तेथेच दबा धरून बसलेला बिबट्या समोर उभा राहिला. महिलेची आणि बिबट्याची क्षणभर नजरा नजर झाली आणि एवढ्यातच बिबट्याने जोराने डरकाळी फोडत महिलेवर झेप घेऊन हल्ला केला.धोक्याची जाणीव झालेल्या महिलेने बिबट्याची झेप चुकवली आणि स्वत:चा प्राण वाचविला. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडी येथे मंगळवारी दुपारी घडली. प्राणावर आलेल संकट धाडसाने परतवलेल्या या महिलेचेे नाव साक्षी मंगेश पवार (३८) असून, पायाला बिबट्याची नखे लागून त्या जखमी झाल्या आहेत.संगमेश्वर तालुक्यातील शिवने सनगरेवाडी येथील साक्षी पवार, प्रणिता सनगरे आणि सुप्रिया सनगरे या तिघी लाकडे आणण्यासाठी दत्तमंदिराच्या स्टॉपजवळील जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी लाकडी काढत असताना समोरच्या जाळीतच दबा धरून बसलेल्या बिबट्याने साक्षी यांच्यावर झेप घेतली. आपल्या दिशेने बिबट्या झेप घेत असल्याचे लक्षात घेताच साक्षी यांनी तत्काळ स्वतःला जमिनीवर झोकून दिले. यामुळे बिबट्याची झेप चुकली आणि एका पंजाची नखे साक्षी यांच्या पायाला लागली. त्यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या प्रणिता सनगरे आणि सुप्रिया सनगरे या तिघींनी आरडाओरड केल्याने बिबट्या पळून गेला.साक्षी पवार यांच्यावर नजीकच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले असून, बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाण्याचे निर्देश येथील वैद्यकीय अधिकारी यांनी दिले आहेत. या हल्ल्यात त्यांच्या पायाला बिबट्याची चार नखे लागली आहेत. त्या जमिनीवर पडल्यामुळे त्यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. देवरुख वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी साक्षी पवार यांच्या घरी जाऊन त्यांची पाहणी केली.

जर मी स्वतःला जमिनीवर झोकून दिले नसते तर बिबट्याची उडी माझ्या अंगावर आली असती आणि कदाचित याच क्षणी माझी मान बिबट्याच्या जबड्यात आली असती. ही घटना म्हणजे माझ्यासाठी दुसरा जन्मच आहे. - साक्षी पवार, शिवने, ता. संगमेश्वर

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Woman Attacked by Leopard, Bravely Fights Back, Survives

Web Summary : In Ratnagiri, a woman collecting wood was attacked by a leopard. Showing immense bravery, she fought back and survived, though sustaining injuries. The incident has caused fear among locals, who are urging forest officials to take immediate action to prevent further attacks.