बेकायदेशीर खरेदीखत तयार करून महिलेला फसविले
By Admin | Updated: May 16, 2014 00:40 IST2014-05-16T00:31:04+5:302014-05-16T00:40:50+5:30
खेड : बेकायदेशीर खरेदीखत तयार करून हर्णै येथील एका महिलेची जमीन लाटण्यात आली. याप्रकरणी संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे.

बेकायदेशीर खरेदीखत तयार करून महिलेला फसविले
खेड : बेकायदेशीर खरेदीखत तयार करून हर्णै येथील एका महिलेची जमीन लाटण्यात आली. याप्रकरणी संबंधित महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. सहाजणांनी संगनमताने आपली जमीन लाटल्याचे या महिलेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कामिनी कृष्णा बोरकर यांच्या मालकीची हर्णै - पाळंद (ता. दापोली) येथील ९ हेक्टर जमीन खोटे खरेदीखत तयार करून परस्पर विकली. यामध्ये कामिनी बोरकर यांचा नातेवाईक अनिकेत बोरकर आणि अन्य पाचजण सहभागी आहेत. याप्रकरणी अमित याने कामिनी यांच्या मृत पतीच्या मृत्यूपूर्वी तयार केलेल्या मुखत्यारपत्राचा वापर केल्याचा आरोप कामिनी यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे. निवेदनाच्या प्रती बोरकर यांनी दापोली पोलीस स्थानक, लोटे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, गृहमंत्री आणि महसूलमंत्र्यांना दिल्या आहेत़ अनिकेत बोरकर हा आपला नातेवाईक असून, त्याने आपल्या मृत पतीच्या नावाचा गैरवापर केल्याचा आरोप कामिनी यांनी केला आहे. आपल्या मालकीची जमीन अनिकेत याने विवेक गंगाधर सावंत, (मालाड, मुंबई), अभिजीत तुषार बोरकर, कांदिवली (मुंबई), संंजीव विश्राम काहे (मालाड, मुंबई), सुजित सचिन म्हात्रे (ठाणे), अनय विठ्ठल नाईक (गिम्हवणे, दापोली) यांना खरेदीखताने परस्पर विकली आहे. आपले पती कृष्णा मोहन बोरकर यांचा मृत्यू ६ मार्च २०१३ रोजी झाला आहे. असे असताना अनिकेत बोरकर याना मयत कृष्णा बोरकर यांनी १४ मार्च २०१३ रोजी ही मिळकत विक्रीकरिता विनाअंमल झालेल्या मुखत्यारपत्राद्वारे दिल्याचे आढळून आले आहे, हे बेकायादेशीर आहे़ दापोली येथील उपनिबंधकांकडे खरेदी-खतासंबंधीची अन्य कागदपत्र पाहता ही बाब प्रकर्षाने दिसून आली. दरम्यान, आपल्या जमिनीमध्ये काही कामानिमित्त आपण गेलो असता विवेक गंगाधर सावंत आणि अभिजीत तुषार बोरकर यांनी आपल्याला हातपाय तोडून टाकण्याची तसेच ठार मारण्याची धमकीदिल्याचे कामिनी बोरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. या जमीन व्यवहारामध्ये आपली फसवणूक झाली असून, जमीन खरेदी घेणारे पाचजण आणि आपला नातेवाईक अनिकेत बोरकर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बोरकर यांनी अधीक्षकांकडे केली आहे. बेकायदेशीर खरेदी खत केल्याप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात (प्रतिनिधी)