भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST2021-05-29T04:24:39+5:302021-05-29T04:24:39+5:30

रत्नागिरी : भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी ८ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. समृद्धी सूर्यकांत ...

Woman dies of burns | भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी ८ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. समृद्धी सूर्यकांत कुळ्ये (३२, रा. तरवळ, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. याबाबत रवींद्र कुळ्ये यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, काही दिवसांपूर्वी समृद्धी घरात वीज नसताना रॉकेलचा दिवा पेटवून जेवण करत होती तेव्हा तिचा पाय लागून दिव्यातील रॉकेल जमिनीवर पडले आणि तिच्या साडीने पेट घेतला. यात ती गंभीर भाजल्याने तिला प्रथम जाकादेवी आरोग्य केंद्रात नेऊन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सावंत करत आहेत.

Web Title: Woman dies of burns