खेडमध्ये महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST2021-03-31T04:32:44+5:302021-03-31T04:32:44+5:30
खेड : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या सनगरवाडी येथे राहणाऱ्या भारती रामचंद्र झोरे हिचा उपचारादरम्यान मृत्यू ...

खेडमध्ये महिलेची आत्महत्या
खेड : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या सनगरवाडी येथे राहणाऱ्या भारती रामचंद्र झोरे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
याबाबत बाबू जानू झोरे यांनी खबर दिली आहे. ते आपल्या नातीला घेऊन घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची सून भारती ही घरात एकटीच होती. अचानक त्यांना घरातून धूर येताना व सुनेच्या किंकाळी मारण्याचा आवाज ऐकू आला. घराला आतून कड्या लावल्याने ते घराची कौले काढून आत गेले असता त्यांच्या सुनेने अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वतःला जाळून घेतल्याचे दिसले. त्यांनी घोंगडीच्या साहाय्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारात भारती ही ९५ टक्के भाजून गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे.