तुरंबव गावात परिवर्तनाचे वारे, केवळ फोटो पूजनाने केले उत्तरकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST2021-04-08T04:31:11+5:302021-04-08T04:31:11+5:30

चिपळूण : तालुक्यामधील तुरंबव - रोहिदासवाडीतील श्रीधर काशीराम पालशेतकर यांचे सुपुत्र अल्पेश श्रीधर पालशेतकर (२३) यांचे नुकतेच निधन झाले. ...

Winds of transformation in Turambav village, only photo worship done | तुरंबव गावात परिवर्तनाचे वारे, केवळ फोटो पूजनाने केले उत्तरकार्य

तुरंबव गावात परिवर्तनाचे वारे, केवळ फोटो पूजनाने केले उत्तरकार्य

चिपळूण : तालुक्यामधील तुरंबव - रोहिदासवाडीतील श्रीधर काशीराम पालशेतकर यांचे सुपुत्र अल्पेश श्रीधर पालशेतकर (२३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे उत्तरकार्य केवळ फोटो पूजनाने करण्यात आले.

कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मारूतीकाका जोयशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही विधी न करता, सत्यशोधक पद्धतीने हे कार्य झाले. यावेळी प्रा. मिलिंद कडवईकर व कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मारुतीकाका जोयशी यांचे प्रबोधनपर व्याख्याने झाले. तसेच तानू आंबेकर व देवरुखकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रा. संदीप येलये, विलास डिके, बारकू बेंडल, अनंत मांडवकर, अरविंद जाधव, मित्रजित कांबळे, सुशील कांबळे, चंद्रमणी मोहिते, अजित मोहिते, मंगेश सावर्डेकर, सुनील बोरगावकर, किरण सावर्डेकर, ओमप्रकाश सावर्डेकर, महेंद्र सावर्डेकर, योगेश पेवेकर, दिलीप पेवेकर, नितेश पेवेकर, संतोष पेवेकर, सुनील सावर्डेकर, कांता चिपळूणकर, राजा जाधव, अजित मोहिते, रोहित मोहिते, मिलिंद मोहिते, प्रशित मोहिते, चंद्रमणी मोहिते आदी उपस्थित होते.

Web Title: Winds of transformation in Turambav village, only photo worship done