शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

...तर मुख्यमंत्री रिफायनरीसाठी आपलं घर, जागा सोडतील का? : सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 11:39 IST

राजापूर ( रत्नागिरी ) : आपली जमीन आणि घर वाचविण्यासाठी लढणाऱ्या महिलांवर जर राज्य शासन काठ्या चालविणार असेल तर ...

राजापूर (रत्नागिरी) : आपली जमीन आणि घर वाचविण्यासाठी लढणाऱ्या महिलांवर जर राज्य शासन काठ्या चालविणार असेल तर मुख्यमंत्री प्रकल्पासाठी आपलं घर आणि जागा सोडतील का, जर मुख्यमंत्री असं करू शकत नाहीत तर या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तरी आपली जागा का सोडावी, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.सोलगाव, बारसू, गोवळ पंचक्रोशीतील महिलांतर्फे देवाचे-गोठणे केरावळे येथे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांकडून रिफायनरी प्रकल्पाच्या आंदोलनाविषयी तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या दमदाटीबाबत माहिती घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी शासनाचा खरपूस समाचार घेतला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांचा प्रकल्पाला विरोध असेल त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नेहमीच जनतेच्या बाजूने राहील, अशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे बारसू, सोलगाव, गोवळ पंचक्रोशीतील स्थानिक भूमिपुत्रांनी उभारलेल्या रिफायनरी प्रकल्प विरोधी लढ्यात शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी राहील.

रिफायनरी प्रकल्पामुळे रोजगार मिळेल या केवळ शासनाच्या अफवा आहेत. प्रकल्प झाल्यास येथील पर्यावरणाचा ऱ्हास होईलच शिवाय मुंबईप्रमाणे कोकणही परप्रांतीयांच्या हातात जाईल. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प अन्यत्र कोठेही करा पण कोकणात नको. - ऋता सामंत-आव्हाड. 

रत्नागिरी जिल्ह्यात बंद पडत चाललेले उद्योग वाचविण्यात येथील पालकमंत्र्यांना रस नाही, मात्र रिफायनरी प्रकल्पासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे, यामागे नेमके गौडबंगाल काय? रिफायनरी ही कोकणाला लागलेली कीड आहे. - ॲड. अश्विनी आगाशे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीnanar refinery projectनाणार प्रकल्पSushma Andhareसुषमा अंधारेEknath Shindeएकनाथ शिंदे