शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघातील गणिते बदलणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 18:56 IST

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे पुन्हा शिवसेनेत परतण्याची चर्चा

सुरेश पवारदस्तुरी : राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणेही बदलू लागली आहेत. या बदललेल्या राजकारणात दापाेलीचे आमदार याेगेश कदम शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांच्या जाण्याने शिवेसेनेतच दाेन गट पडले असून, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खेड-दापाेली-मंडणगड मतदारसंघातील राजकीय गणित बदलत असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी स्वगृही परत येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे या मतदार संघातील गणित आणखी बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता पाहायला मिळाली. अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. या सत्तांतरानंतर अनेक ठिकाणी स्थानिक परिस्थितीमध्येही बदल झाले. अनेक ठिकाणी पक्षांतराचे वारे वाहत आहेत.

आगामी २०२४ची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट व भाजप अशीच हाेण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीमध्ये सहभागी असणारे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यामध्ये जागावाटप होताना प्रामुख्याने विजयी उमेदवाराला प्रथम संधी दिली जाण्याची चर्चा आहे. दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये याेगेश कदम यांच्या रूपाने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र, आमदार योगेश कदम हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटल्यास ठाकरे गटाचा उमेदवार रिंगणात उतरणार, हे निश्चित आहे.राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे पुन्हा शिवसेनेत परतण्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. त्यांनी पुन्हा शिवबंधन हातात बांधले तर ठाकरे गटाकडून त्यांचा निवडणुकीसाठी विचार हाेण्याची चिन्हे आहेत. त्यातच शिवसेनेत दाेन गट निर्माण झाल्यानंतर जुन्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय कदम यांच्याशी जवळीक साधल्याची चर्चा आहे. त्यातूनच त्यांनी पुन्हा शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतल्याचीही चर्चा आहे. तसे झाल्यास दाेन कदम पुन्हा एकमेकांसमाेर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाYogesh Kadamयोगेश कदम