शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

खेडमधील स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडणार की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 17:34 IST

Natak, Khed, Coronavirus Unlock, Ratnagiri खेड तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीचे एकमेव साक्षीदार असलेले स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह गेली १२ वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. या १२ वर्षात नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, या नाट्यगृहाचा पडदा अद्याप उघडला नसल्याने बंद पडलेले नाट्यगृह पुन्हा सुरु होणार की नाही? असा प्रश्न खेडमधील नाट्यरसिक आता विचारू लागले आहेत.

ठळक मुद्देठाकरे नाट्यगृहाचा पडदा उघडणार की नाही?खेडच्या नाट्यरसिकांची नगर प्रशासनाकडे विचारणा

खेड : तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीचे एकमेव साक्षीदार असलेले स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृह गेली १२ वर्षे दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. या १२ वर्षात नाट्यगृहाच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतु, या नाट्यगृहाचा पडदा अद्याप उघडला नसल्याने बंद पडलेले नाट्यगृह पुन्हा सुरु होणार की नाही? असा प्रश्न खेडमधील नाट्यरसिक आता विचारू लागले आहेत.नगर परिषदेने १९९६ साली शहरामध्ये सुसज्ज नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला. तत्कालिन नगरविकास मंत्री सुनील तटकरे यांच्या माध्यमातून आवश्यक असलेला पावणेदोन कोटींचा निधी उपलब्ध होताच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत नाट्यगृहाची दिमाखदार इमारत उभी राहिली. २००१ साली नाट्यगृहाचे मीनाताई ठाकरे असे नामकरण करून ही वास्तू नाट्यरसिकांच्या सेवेत रुजू झाली.या आठ वर्षात नाट्यरसिकांना या नाट्यगृहात अनेक दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता आला. ज्येष्ठ रंगकर्मी स्व. डॉ श्रीराम लागू, स्व. लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या दिग्गज कलाकारांचा जिवंत अभिनय अगदी जवळून अनुभवता आला. नाटकांप्रमाणेच जादुचे प्रयोग, राजकीय मेळावे, शाळा, महाविद्यालयांची स्नेहसंमेलने होऊ लागली. मात्र, २००८ साली या नाट्यगृहाला ग्रहण लागले.एका कार्यक्रमादरम्यान नाट्यगृहाच्या व्हराड्यांत प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत एकाएकी कोसळले आणि केवळ आठ वर्षातच लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारत डागडुजीला आल्यावर शिक्कामोर्तब झाले. एक-दोन वर्षात इमारतीच्या डागडुजीचे काम पूर्ण होईल आणि नाट्यगृहाचा पडदा पुन्हा एकदा उघडेल, असे अपेक्षित होते. मात्र, तब्बल १२ वर्षे उलटली तरीही नाट्यगृह रसिकांच्या सेवेत रुजू करणे शक्य झालेले नाही.गेल्या १२ वर्षात खेड नगर परिषदेत तीनवेळा सत्ताबदल झाले. अनेकदा नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा प्रश्न कळीचा मुद्दा ठरला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. नाट्यगृह सुरु करण्याबाबतच्या तारख्या दिल्या गेल्या. मात्र, आजतागायत नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजलीच नाही. हे नाट्यगृह यापुढे तरी नाट्य रसिकांसाठी खुले होईल का? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :NatakनाटकCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरी