शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार, राज ठाकरे यांची नाणारमधील प्रकल्पग्रस्ताना ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 14:42 IST

रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानात ही गोष्ट नीटपणे घालेन. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाणार येथील ग्रामस्थांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देराज ठाकरे म्हणाले, प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्या पाठीशी राहणारराज यांची नाणारमधील प्रत्यक्ष प्रकल्प परिसरातील प्रकल्पग्रस्ताना ग्वाहीशनिवारी नाणार परिसराला दिली भेट

राजापूर : रिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानात ही गोष्ट नीटपणे घालेन. मी हाती घेतलेले कोणतेच काम अर्धवट ठेवत नाही. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाणार येथील ग्रामस्थांशी बोलताना दिली.राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. तरीदेखील हा प्रकल्प होणारच असे विधान मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत केले आहे. त्यामुळे हा विरोध आणखीनच वाढला आहे.

ग्रामस्थांच्या विरोधानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभीमान पक्षानेदेखील ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचा निर्णघ घेत प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र, याबाबत मनसेने आपली कोणतीच भूमिका स्पष्ट घेतलेली नाही.नाणार परिसरातील ग्रामस्थांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्याने आपण प्रत्यक्ष प्रकल्प परिसरातील ग्रामस्थांची भेट घेऊन आपली भूमिका मांडू असे जाहीर केले होते. त्यानुसार शनिवारी नाणार परिसराला भेट दिली.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बाळा नांदगावकर उपस्थित होते. या भेटीदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आम्हाला हा प्रकल्प नको असे ठणकावून सांगितले. त्याचबरोबर मनसेने एक दणका देऊन हा प्रकल्प येथून हटवावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.यावेळी राज ठाकरे म्हणाले की, कोकणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कोकणी माणूस स्वस्त आहे, असा समज झाल्याने कोकणाच्या माथी असे प्रकल्प लादले जात आहेत.

कोकणची ताकद दाखवून द्या, या प्रकल्पाला कडाडून विरोध करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मात्र, जर फूट पडतील तर मग ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. आज होला किंमत नाही तर जगात नाहीला किंमत आहे. त्यामुळे प्रकल्प नको या भूमिकेवर ठाम रहा, मनसे तुमच्या सोबत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRatnagiriरत्नागिरीkonkanकोकण