वावे येथील कर्मचारी निवासस्थानासाठी २५ लाख उपलब्ध करून देणार : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST2021-06-19T04:21:31+5:302021-06-19T04:21:31+5:30

खेड : तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान उभारण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती ...

Will provide Rs 25 lakh for staff accommodation at Vave: Bhaskar Jadhav | वावे येथील कर्मचारी निवासस्थानासाठी २५ लाख उपलब्ध करून देणार : भास्कर जाधव

वावे येथील कर्मचारी निवासस्थानासाठी २५ लाख उपलब्ध करून देणार : भास्कर जाधव

खेड : तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान उभारण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली. याचवेळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांनी

लोटे गटातील वावे प्राथमिक आरोग्य

केंद्रासाठी रुग्णवाहिकेची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष जाधव यांच्याकडे केली होती. तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात

आली. लोकार्पण सोहळ्यादरम्यान आमदार

जाधव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची

पाहणी करीत याठिकाणी असलेल्या कर्मचारी

निवासस्थानाची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास

आल्यानंतर निवासस्थानासाठी २५ लाखांचा

निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

दिले.

यावेळी पंचायत समिती सभापती मानसी

जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, जिल्हा परिषद सदस्य सुनील मोरे, पंचायत समिती सदस्य

कृष्णा लांबे, अप्पा पालांडे, विष्णू कदम,

विभागप्रमुख संतोष उतेकर, तालुका वैद्यकीय

अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके आदी उपस्थित

होते.

-------------------------------

खेड तालुक्यातील वावे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे

लोकार्पण अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Will provide Rs 25 lakh for staff accommodation at Vave: Bhaskar Jadhav