शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
2
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
3
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
4
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
5
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
6
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
7
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
8
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
9
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
10
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
12
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
13
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
14
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
15
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
16
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
17
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
18
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
19
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
20
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा

संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी लागेल तेवढा निधी देऊ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:02 IST

देवरुख : कोकणाला जास्तीचा निधी कधी मिळत नव्हता. मात्र, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ. राष्ट्रीय पातळीचे ...

देवरुख : कोकणाला जास्तीचा निधी कधी मिळत नव्हता. मात्र, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ. राष्ट्रीय पातळीचे स्मारक करताना हेरिटेज टच देऊन येथील हवामानाच्या दृष्टीने ते टिकाऊ बनवू या. निधीची काळजी करू नका, स्मारकासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या नियाेजित स्मारकाच्या जागेची पाहणी उपमुख्यमंत्री पवार यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी कर्णेश्वर मंदिर परिसरात आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, पुरातत्व विभागाचे स्थापत्य अभियंता इंद्रजित नागेशकर, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, तहसीलदार अमृता साबळे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी कसबा येथे दाखल हाेताच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संभाजी स्मारक परिसरासह सरदेसाई वाड्याची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत स्थापत्य अभियंता नागेश्वर यांनी पॉवर पॉइंटद्वारे माहिती दिली.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. स्थानिकांच्या भावना जराही दुखावणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांच्या सहमतीने स्मारक उभे करायचे आहे. ज्याची जागा जाईल त्यांना योग्य तो मोबदला देऊ. स्मारक भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून अन्य मोठमोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पाचा अभ्यास करावा, असे सुचविले. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड येथील अभियंता शेखर सिंग यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला.

अधिवेशनापूर्वी सर्व बाबी पूर्ण करास्थानिक पातळीवरील नकाशे, अन्य बाबी लवकरात पूर्ण करून मला माहिती द्या. ३० जूनला पावसाळी अधिवेशन होत आहे. यात स्मारकासाठीच्या निधीला मंजुरी द्यायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीचे सरकार छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक हे राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल, यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.

सायरनच्या आवाजाने मधमाश्या पिसाळल्याकर्णेश्वर येथील आढावा बैठक संपवून संगम मंदिराची पाहणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा सायरन वाजताच संगम मंदिरानजीक असणाऱ्या मधाच्या पोळ्यामधील मधमाश्या बाहेर आल्या. या माश्या आवाजाच्या दिशेने धावून आल्या, यातील काही मधमाश्यांनी दोघांना चावल्याचीही चर्चा आहे.

प्रसारमाध्यमांना राेखलेकसबा येथील छत्रपती संभाजी स्मारकाच्या नियाेजित जागेची पाहणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना राेखले. ‘अरे थांबा ना बाबा, मराठीत सांगितलेले कळत नाही, आम्हाला काम करू द्या, तुम्ही त्रास दिला तर निघून जाईन,’ असे ते म्हणाले. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी संवाद न साधताच ते निघून गेले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजAjit Pawarअजित पवार