शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला हरित प्रकल्प नाव कशामुळे दिले? कोकणातील पर्यावरणाची आधीपासूनच घेणार काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:01 IST

२० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे.

रत्नागिरी : बारसू (ता. राजापूर) येथे होणाऱ्या केंद्र सरकारच्या बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पात उपयोगात येणारे पाणी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पुनर्वापर प्रक्रिया यांचा वापर करून त्याचा पुनर्वापर या रिफायनरीमध्येच करण्यात येणार आहे. त्यामुळे हे पाणी बाहेर सोडले जाणार नाही. या प्रकल्पात शून्य द्रव उत्सर्जित होणार असल्याने कोकणच्या दृष्टीने पर्यावरणाला पूरक असणारा असा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याने रत्नागिरीला हानिकारक असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात असल्याने यातून या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. २० एमएमएटीपीए एवढ्या क्षमतेच्या या रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार एकर आणि क्रूड ऑइल टर्मिनलसाठी १,००० एकर जागा लागणार आहे.प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा हरित असल्याने जगातील बहुतेक रिफायनरीपेक्षा अधिक हरित आणि स्वच्छ असणार आहे. ही रिफायनरी हरित करण्यासाठी विशिष्ट अशी रचना करण्यात आली आहे. या रिफायनरीमध्ये उपयोगात येणारे पाणी आधुनिक तंत्रज्ञान व आधुनिक पुनर्वापर प्रक्रिया यांचा वापर करून  रिफायनरीमध्येच पुनर्वापर होणार आहे. त्यामुळे हे  पाणी बाहेर सोडले जाणार नाही. कार्बन उत्सर्जन कमीत कमी असणारी जागतिक दर्जाची ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचा वापर होणार असून वायू उत्सर्जन करताना ऑनलाइन तपासणी यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यायोगे वायू परिमाण सातत्याने तपासणी नियंत्रित केली जाणार आहे. कमी कार्बन उत्सर्जन असणाऱ्या इंधनांचा वापर करण्यात येणार आहे. 

कसा असेल प्रकल्प --     दाेन लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित.-     भारतातील सार्वजनिक तेल क्षेत्रातील इंडियन ऑइल काॅर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड या प्रमुख तेल कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे.-     साैदी येथील M/S Saudi Aramco आणि यूएई येथील ADNOC दोन जागतिक स्तरावरील कंपन्या गुंतवणुकीसाठी इच्छुक.  

टॅग्स :konkanकोकणBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पRatnagiriरत्नागिरी