व्हॉटसअपमुळे भेटले विशीपूर्वीचे मित्र

By Admin | Updated: September 14, 2014 23:56 IST2014-09-14T22:15:17+5:302014-09-14T23:56:16+5:30

१९९३च्या दहावी ‘ड’ वर्गातील विद्यार्थ्यानी एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले

Whotspace met before the former friends | व्हॉटसअपमुळे भेटले विशीपूर्वीचे मित्र

व्हॉटसअपमुळे भेटले विशीपूर्वीचे मित्र

रत्नागिरी : शालेय जीवनातील आठवणी या केवळ त्याच कालावधीसाठी सीमति राहतात. दहावीनंतर प्रत्येकजण विविध शाखेची निवड करून आपापले करियर बनविण्यासाठी बाहेर पडतात. आपल्या भावविश्वात मग्न असलेला मित्रवर्ग व्हॉटस्पमुळे एकत्र आला. रा. भा. शिर्के प्रशालेतील १९९३च्या दहावी ‘ड’ वर्गातील विद्यार्थ्यानी एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे केले.
व्हॉटस्अपमुळे दहावी ‘ड’च्या विद्यार्थ्यांनी संदेश वहन करीत भेटण्याचे ठरविले. काही मंडळी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे स्थायिक झाली आहेत. त्यामुळे सर्वांना सोयीस्कर ठरेल, यासाठी शाहुवाडी तालुक्यातील आंबा येथे स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. नोकरीसाठी परदेशात वास्तव्य करणारी मंडळीही स्नेहसंमेलनाला उपस्थित होती. भेटी, ओळख, तसेच चर्चा, गुजगोष्टी, स्नेहभोजन असा दिवसभर भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापुढे दरवर्षी सर्व मंडळींनी एकत्र येण्याची तयारी दर्शविली आहे. या कार्यक्रमाला काही अनुपस्थित राहिले होते, त्यांनाही सहभागी करून घेण्याचे ठरले. व्हॉटसअपमुळे हे शक्य झाल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. या स्नेहमेळाव्यात मयुरेश खानविलकर, संदीप वैष्णव, दिंगबर मगदूम, रवी बने, सुशील देवरूखकर, नदीम मुजावर, केदार माणगावकर आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

व्हॉटस्अपच्या माध्यमातून भेटलेल्या वीस वर्षांपूर्वींच्या मित्रांचे स्नेहसंमेलन नुकतेच साजरे झाले.

Web Title: Whotspace met before the former friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.