शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोण किरीट सोमय्या, भाजपने असे १०० सोमय्या सोडलेत - भास्कर जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:35 IST

किरीट सोमय्या यांच्याबाबत विचारले असता भास्कर जाधव संतापले

चिपळूण : ही वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही. ही वेळ आहे की, ‘भूला हुवा शाम घर आया, तो उसे भूला नही कहते’ म्हणण्याची आणि कृतीमध्ये उतरविण्याची वेळ आहे. ही एकमेकांना आव्हाने - प्रतिआव्हाने देण्याची वेळ नाही, त्याने प्रश्न सुटेल असे नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धिचातुर्य वापरा, असा सल्ला आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे मुख्य पक्षप्रवक्ते संजय राऊत यांना दिला आहे.गुहागरचे आमदार भास्कर जाधव शुक्रवारी चिपळूण येथील आपल्या गावी आले असता, प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. संजय राऊत यांनी मुंबईत येऊन आमच्यासोबत बसा, असे ट्वीट केले हाेते. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर त्यांची मनधरणी होऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी भास्कर जाधव यांना विचारला. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांना सल्ला देण्याइतका मी माेठा नाही.संवाद हा लोकशाहीचा आत्मातरीही त्यांना नम्रपणे विनंती करेन की, ही वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही. आव्हाने - प्रतिआव्हाने देऊन हा प्रश्न सुटेल असे नाही. घटनात्मक तरतुदीचा आधार घ्या. त्याचबरोबर संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. आव्हानात्मक भाषा वापरण्याऐवजी संवादात्मक भाषा वापरूया, जोडण्याची भाषा वापरूया, आपली माणसे आहेत, ती आपल्या जवळ येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आमदार जाधव म्हणाले.कोण किरीट सोमय्या?संजय राऊत वारंवार प्रसार माध्यमांसमोर येऊन किरीट सोमय्या यांच्याविरोधात बोलायचे, त्यावर भास्कर जाधव यांना विचारले असता, काय किरीट सोमय्या घेऊन बसलात? कोण किरीट सोमय्या, असा प्रति प्रश्नच त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने असे १०० सोमय्या सोडलेले आहेत. महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय असे ते म्हणाले

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधवKirit Somaiyaकिरीट सोमय्या