शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: खवले मांजराची तस्करी, दोघे वन विभागाच्या जाळ्यात; एका महिलेचा समावेश

By संदीप बांद्रे | Updated: June 26, 2023 12:10 IST

चिपळूण : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करताना दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. दापोली व ...

चिपळूण : खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करताना दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश आहे. दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोटे येथे महामार्गावर सापळा रचून ही कारवाई केली. मिलींद वसंत सावंत (वय-५५ रा, मालाड, मुंबई) व मिना मोहन कोटिया (६२ रा. लोटे, ता. खेड) या दोघांकडून खवले मांजराचे ०.९३० किलोग्रॅम इतके खवले जप्त केले.  याबाबत माहिती अशी की, लोटे येथे दोन अज्ञात व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांची विक्रीसाठी येत असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी चिपळूण यांना मिळाली. माहितीनुसार लोटे येथे महामार्गावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. लोटे येथे काल रविवारी सायंकाळच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळून आल्या. अधिक चौकशी केली असता सदर दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये खवले मांजराची खवले असल्याचे व ते विक्रीसाठी तेथे आले असल्याचे आढळून आले. यानंतर दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. ही कार्यवाही दिपक खाडे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) व रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक सातारा) यांचे नेतृत्वामध्ये पी. जी. पाटील, परिक्षेत्र वनअधिकारी दापोली, वैभव बोराटे (परिक्षेत्र वनअधिकारी फिरते पथक रत्नागिरी) यांचेमार्फत करणेत आली. या धडक मोहिमेत सुरशे उपरे वनपाल खेड, साताप्पा सावंत वनपाल दापोली, उमेश आखाडे वनपाल सावर्डे, तसेच शुभांगी गुरव वनरक्षक, अशोक ढाकणे वनरक्षक, अश्विनी जाधव वनरक्षक कृष्णा इरमले वनरक्षक, हे सहभागी होते. पुढील तपास पी. जी. पाटील परिक्षेत्र वनअधिकारी दापोली व राजश्री किर परिक्षेत्र वनअधिकारी चिपळूण हे करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग