शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गुगलचा जवळचा रस्ता टेम्पोचालकाच्या आला जिवाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:01 IST

फुणगुसनजीक वळणावर आयशर टेम्पो उलटला

देवरुख : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाताना गुगल मॅपद्वारे जवळचा रस्ता शोधून फुणगुस मार्गे जाताना केमिकलने भरलेला आयशर टेम्पो उलटून अपघात झाला. गाडीचा अपघात होतोय हे लक्षात आल्यानंतर चालकाने वेळीच उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. मात्र, आयशरमधील केमिकलने भरलेली पिंपे घनदाट जंगलात गडगडत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.रंग तयार करण्यासाठी लागणाऱ्या केमिकलची ४७ पिंपे घेऊन आयशर टेम्पो (जेजी ३७ बी २२६०) चालक सोमवारी महामार्गावरून गोव्याकडून मुंबईकडे जात होता. निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. गुगल मॅपने फुणगुस आणि उक्षी मार्ग दाखवला. मात्र, उक्षी मार्गावरील अवघड वळणामुळे त्याने जाकादेवी-फुणगुस मार्गे संगमेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला.फुणगुस येथे सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान आला असता एका अवघड वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने आयशर उजव्या बाजूला कलंडला. यामध्ये असलेले ४७ बॅरलपैकी ३० बॅरल शिल्लक राहिले आहेत. बाकीचे बॅरल उतारावरून जंगलात गडगडत गेले आहेत. टेम्पोचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती पोलिस पाटलांनी संगमेश्वर पोलिस स्थानकाला दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.