शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या समन्वय समितीत जे ठरतं तेच घडतं; स्थानिक पातळीवरील टीकांवरून मंत्री सामंतांनी काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:31 IST

‘त्या’ निर्णयांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मान्यता

रत्नागिरी : महायुतीच्या समन्वय समितीत जे ठरतं तेच घडतं, स्थानिक पातळीवर युती करायची की नाही, हे ठरत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर काेण काय बाेलले, याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. प्रत्येकाचा मानसन्मान राखून युती झाल्यास मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकेल, असे राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.रत्नागिरीत घेतलेल्या आढावा बैठकीची माहिती देण्यासाठी रविवारी मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुती म्हणून लढण्याची इच्छा शिंदेसेनेचीही आहे. याबाबत भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशीही माझी चर्चा झाली असून, त्यांनीही या गाेष्टीला सहमती दिलेली आहे. प्रत्येकाचा मानसन्मान राखू. महायुती झाली तर महायुतीचा भगवा निश्चितच फडकेल, असे त्यांनी सांगितले.

भाजपचे माजी आमदार डाॅ. विनय नातू यांनी केलेल्या आराेपाबाबत विचारले असता ते म्हणाले, त्याला जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख हे उत्तर देतील, असे सांगितले. मी समन्वय समितीत आहे. तीन पक्षांचे जे संघटनात्मक धाेरण ठरतं त्या समन्वय समितीत मी प्रमुख आहे. त्यामुळे खालच्या पातळीवर काेण काय बाेलले, याकडे लक्ष देणे आवश्यक वाटत नाही. आम्ही धाेरण करताे, जिल्ह्याला पाठवताे त्याची अंमलबजावणी तिथल्या जिल्हाध्यक्षांनी करायची आहे, असे त्यांनी सांगितले.

‘त्या’ निर्णयांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मान्यतामहायुतीच्या समन्वय समितीत मी असेन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे निर्णय घेतले त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे काेण काय बाेलतं, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मंत्री सामंत म्हणाले.