राजापुरात अवैध धंद्यांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:30 IST2021-05-15T04:30:43+5:302021-05-15T04:30:43+5:30

राजापूर : एकीकडे राजापूर शहर आणि तालुका कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट होत असताना दुसरीकडे मात्र राजापूर एस़ टी़ ...

Weaving illegal trades in Rajapur | राजापुरात अवैध धंद्यांना ऊत

राजापुरात अवैध धंद्यांना ऊत

राजापूर : एकीकडे राजापूर शहर आणि तालुका कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट होत असताना दुसरीकडे मात्र राजापूर एस़ टी़ डेपोच्या परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. या ठिकाणी राजरोसपणे जुगार आणि मटक्याचा व्यवसाय सुरू असून, पोलीस प्रशासनाने याकडे जरा गांभीर्याने पाहावे, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे.

सध्या सर्वत्र कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर आहे. राजापुरात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सर्व अत्यावश्यक सेवाही बंद आहेत. सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. याही परिस्थितीत राजापूर शहरात एस़ टी़ डेपोसमोर गेले काही दिवस जुगार, मटका यांसारख्या अवैध धंद्यांना ऊत आल्याचे गुरव यांनी म्हटले आहे. राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून मिरविणारे हेच या अवैध धंद्यांना खतपाणी घालत असल्याचा आराेप त्यांनी केला आहे. दोनच दिवसांपूर्वी जुगार व मटका अड्ड्यावर वाद होऊन प्रकरणात हाणामारी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे़

Web Title: Weaving illegal trades in Rajapur