शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Waterfalls in Konkan: पर्यटकांना खुणावतो मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 12:36 IST

दुधाळ व फेसाळणारा असा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्यामध्ये मोठी गर्दी

- सचिन मोहिते, देवरुखसह्याद्रीच्या कुशीत हिरव्यागार शालूने नटलेल्या उंचच उंच डोंगररांगा आणि समोर फेसाळणारा धारेश्वर धबधबा असे विहंगम नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यातील संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ म्हणजे मार्लेश्वर. याठिकाणचा उंचावरून काेसळणारा, फेसाळणारा धारेश्वर धबधबा भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणावा लागेल. संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर तीर्थक्षेत्री तालुक्यातीलच नाही तर राज्यभरातून लाखो भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने दाखल हाेतात. मार्लेश्वर हे पर्यटनस्थळ देवरुख बसस्थानकापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आहे. तर कोल्हापूरकडून येताना आंबा घाट कळकदरा येथून खडीकोळवण मार्गे २० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या पर्यटनस्थळी पायथ्यापर्यंत गाड्या जाण्याची व्यवस्था आहे. तिथून सुमारे ४५० पायऱ्या चढून वर जावे लागते. तिथे गेल्यानंतर गुहेमध्ये स्वयंभू मार्लेश्वराचे देवस्थान आहे. या देवस्थानच्या समोरील बाजूस उंचच उंच हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आहेत.या डोंगररांगातून सात छोटे-छोटे धबधबे प्रवाहित आहेत. हे धबधबे उंचावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याला जाऊन मिळतात. त्यामुळे देवस्थानच्या समोरून दिसणारा मोठा धबधबा पावसाळ्यामध्ये धुवाॅंधार वाहत असतो. दुधाळ व फेसाळणारा असा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाळ्यामध्ये मोठी गर्दी हाेते. उंचावरून काेसळणारा धबधबा, प्राण्यांचा - पक्ष्यांचा किलबिलाट अशा आल्हाददायक वातावरणात अनेक पर्यटक आपला वेळ घालवतात.धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या व वाट आहे. मात्र, पावसाळ्यात हा धबधबा अति प्रवाहित असतो. त्यावेळी धबधब्याखाली आंघोळ करणे धोक्याचे आहे. सातत्याने उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्यामुळे येथे तलावसदृश्य स्थिती निर्माण हाेते. त्याची खोलीही मोठी आहे. त्यामुळे पावसाच्या दिवसात धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात येते. तशा प्रकारचे सुरक्षा फलकही याठिकाणी लावण्यात आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन