शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण शहरातील तळ्यांमधील पाणीपातळी खालावली, मे अखेरीस आणखीन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:47 IST

पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरणाऱ्या शहरातील तळ्यांमधील पाण्याची पातळी सध्या कडक उन्हामुळे कमालीची खालावली आहे. त्यामुळे या तळ्यातील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गतवर्षी शहरातील रामतीर्थ तलावाचा गाळ काढल्यामुळे या तलावातील पाण्याच्या पातळीत फारशी घट झालेली नाही.

ठळक मुद्देपशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न तलावांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या शहरात मोजकीच तळी शिल्लक

चिपळूण : पावसाळ्याच्या दिवसात तुडुंब भरणाऱ्या शहरातील तळ्यांमधील पाण्याची पातळी सध्या कडक उन्हामुळे कमालीची खालावली आहे. त्यामुळे या तळ्यातील पाण्यावर अवलंबून असणारे पशु-पक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, गतवर्षी शहरातील रामतीर्थ तलावाचा गाळ काढल्यामुळे या तलावातील पाण्याच्या पातळीत फारशी घट झालेली नाही.यापूर्वी तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळुणात आता केवळ मोजकीच तळी शिल्लक राहिली आहेत. शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले रामतीर्थ, विरेश्वर व नारायण तलाव एवढे मोजकेच तलाव आता अस्तित्वात आहेत.

यामधील विरेश्वर तलावाची पाण्याची पातळी खालावली असून, तळाचा भाग दिसू लागला आहे. नारायण तलावाचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी त्याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत तलावातील गाळ काढण्यात आल्याने येथील पाण्याची पातळी टिकून आहे.रामतीर्थ तलावाचाही गेल्यावर्षी गाळ काढण्यात आल्याने येथेही पाणीपातळीत फारशी घट झालेली नाही. त्यामुळे शहरातील शंकरवाडी, पवारआळी, मार्कंडी परिसरातील जनावरांना या तलावातील पाण्याचा आधार मिळत आहे. मात्र, मे महिन्याच्या उत्तरार्धात येथील पाण्याच्या पातळीतही घट होण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतानाच शहरातील तळ्यांमधील पाण्याच्या पातळीत घट होऊ लागल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणारे पशुपक्षी, जलचर यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरी